काहीबाही

काहीबाही ५ – आयुष्य कुठे घेऊन चाललंय देव जाणे…

आयुष्य कुठे घेऊन चाललंय देव जाणे…

“विस्कटून विखुरलेल्या आयुष्याला वेचता वेचता दमछाक व्हावी, विस्मरणात गेलेले काळजाचे ठोके चुकवणारे आठवणींचे दुवे सापडावेत आणि दुव्याला लागून अजून काही दुवे हातात यावेत…अनंतकाळापर्यंत हाच खेळ चालत राहावा त्यात त्या करत्या करावीत्याने माझ्या भाबडेपणावर गालातल्या गालात हसून हलकेच फुंकर घालून गोळा केलेले सारे क्षण पुन्हा विखरून टाकावेत…..म्हणजे समुद्रकिनार्याची वाळू घट्ट मुठीत पकडून पाण्यात उभारल्या सारखा वाटेल….वाळू मुठीत कितीही घट्ट पकडली तरी ती निसटणारच आणि तो फेसाळलेल्या समुद्राने पुन्हा त्याच निर्मिकासारखे निर्विकार हसावे. मग मीही आभाळाकडे पाहून हलकंसं हसूनच मनातल्या मनात त्याला म्हणावं तू काहीही केलंस तरी मी सुद्धा हरणाऱ्यातला नाही, शेवटी मीही तुझीच निर्मिती आहे.”

हे असले विचार यायला लागतात म्हणूनच वाटतं आयुष्य कुठे घेऊन चाललंय देव जाणे…

©संदेश मुळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *