काहीबाही

काहीबाही ८ – पत्र

मनाच्या आचारसंहितेत, शब्दांना हाताशी धरून भावनांनी बंडखोरी केली. अभ्रकासारख्या पांढऱ्याशुभ्र कागदावर रक्तरंजित आंदोलनं केली. वाळूत पाऊलांचे ठसे उमटावेत तशी अभ्रकावर चित्रविचित्र पण एकसंध नक्षी तयार झाली, भावनांच्या आणि शब्दांच्या पाउलांची.मी आभाळभरून प्रयत्न केले तरी भावनांची बंडखोरी मोडणं मला शक्य झालं…

पुढे वाचा

काहीबाही

काहीबाही ७ – कृष्णविवरा सारखे शून्य

कसं होतं, आपल्या आयुष्यात खूप सारे प्रसंग, खूप साऱ्या गोष्टी घडुन गेलेल्या असतात, भले त्या चांगल्या असो किंवा वाईट. तेवढ्यापुरतं त्या गोष्टीचा आनंद किंवा दुःख होतं, नंतर आपण ती गोष्ट विसरून हि जातो, पण तरी आपल्या सुदैवानं म्हणा किंवा दुर्दैवानं,…

पुढे वाचा

काहीबाही

काहीबाही ६ – खजिना

परवा मिळाले काही,पुसट झालेल्या अक्षरांचे निनावी कागद,झिरझीर झालेली जाळीदार पिंपळपानं,काटे नसलेला पण दरवळणारा तो गुलाब,तो शाईपेन आणि एकंच पान लिहिलेली डायरी,त्यातलेही काही शब्द कसल्याश्या पाण्याने पुसटलेले,आणि एका पुरचुंडीत बांधलेले क्षणही सापडलेअबोल्याचे, रुसव्याचे, प्रेमाचे, ओढीचे,काही तुझे, काही माझेसारे एकमेकांना घट्ट बिलगून…

पुढे वाचा

काहीबाही

काहीबाही ५ – आयुष्य कुठे घेऊन चाललंय देव जाणे…

आयुष्य कुठे घेऊन चाललंय देव जाणे… “विस्कटून विखुरलेल्या आयुष्याला वेचता वेचता दमछाक व्हावी, विस्मरणात गेलेले काळजाचे ठोके चुकवणारे आठवणींचे दुवे सापडावेत आणि दुव्याला लागून अजून काही दुवे हातात यावेत…अनंतकाळापर्यंत हाच खेळ चालत राहावा त्यात त्या करत्या करावीत्याने माझ्या भाबडेपणावर गालातल्या…

पुढे वाचा

काहीबाही

काहीबाही ४ – निरर्थक

त्याला त्याचीच लाज वाटू लागली, स्वतःच्या नैतिक जवाबदारीची वेस ओलांडून तो केंव्हाच असंख्य प्रकाशवर्ष दूर निघून गेला होता.बोथट झालेल्या जाणीवा कधीच स्वतःच्या निष्क्रियतेच्या काळजाचा ठाव घेऊ शकल्या नव्हत्या. मनातली सल कुरूप होऊन साऱ्या मनाला उध्वस्त करू पाहतेय आणि हा पश्चतापचं…

पुढे वाचा

काहीबाही

काहीबाही ३ – पावसाळलेला मी

वळवाच्या पावसाचा पडणारा प्रत्येक थेंब उन्हांनं रापलेल्या मनाला आणि शरीराला एवढा सुखावून जातो कि वाटतं बस् हाच तो परमोच्च क्षण ज्यासाठी आपली मनं युगानुयुगं आतुरली होती, हीच ती वेळ जेंव्हा स्वतः स्वैर वाऱ्यावर स्वार होऊन दशदिशांवरून येणाऱ्या वर्षाशरांनी घायाळ व्हावं,…

पुढे वाचा

काहीबाही

काहीबाही २ – निद्राराक्षस

रात्रीच्या उदरात दडलेले शांततेचे भेसूर आवाज ऐकण्याचा मोह अनावर होऊ लागला ना की समजाव कि मागचे कितीही लक्ष जन्म कुणीही असलो तरी किमान या जन्मी तरी सटवीनं निशाचराचंच भाग्य पाचवीला पुजताना कापाळी लिहिलेलं आहे.आता कृष्ण पक्षातील चंद्र अमावस्येची ओढ लागून…

पुढे वाचा

काहीबाही

काहीबाही १ – संध्यास्वप्न..

मि गगनाला गवसनी घालायला निघालोय, उत्साह शिगेला पोहोचला आहे.पण आता तो तात्पुरता वाटायला लागलाय. दोन क्षणांचा उत्साह, बाकी क्षण फक्त निरुत्साह गिळून निपचित पडलेल्या अजगरासारखेच…आता सगळा प्रवास सुर्यमालेतील कोणत्यातरी कृष्णविवरातुन होतोय असे भास होतायत..अचानक आकाशगंगेतील तारका जेव्हा पायाखालून जायला लागल्या तेव्हा…

पुढे वाचा